Top News

आजारी युवतीला तपासताना 'बॅड टच', डॉक्टर गजाआड

🌄
गडचिरोली:- आजारी असल्याने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन युवतीला 'बॅड टच' केल्याच्या आरोपावरुन एका खासगी डॉक्टरवर गुन्हा नोंद झाला. अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी संबंधित डॉक्टरला जेरबंद केले आहे.

🌅
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष मदेर्लीवार असे त्या डॉक्टरचे नाव आहे. आलापल्लीत त्याचा खासगी दवाखाना आहे. अहेरी तालुक्यातील १७ वर्षीय युवती २६ नोव्हेंबरला दुपारी त्याच्या दवाखान्यात उपचारासाठी आली. यावेळी एक रुग्ण महिला बाहेर बसलेली होती. दालनात तपासणीसाठी गेल्यावर डॉ. संतोष मदेर्लीवारने 'बॅड टच' केला, असा आराेपी युवतीने केला. नातेवाईकांसह तिने अहेरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन रात्री विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपासचक्रे फिरवून तातडीने डॉ. संतोष मदेर्लीवारला अटक केली.
🌄

न्यायालयीन कोठडीत रवानगी

दरम्यान, २७ नोव्हेंबरला आरोपी डॉ. संतोष मदेर्लीवारला पोलिसांनी अहेरी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज काळबांंडे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने