ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या #chandrapur #nagpur #murder

Bhairav Diwase
0

नागपूर:- ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार पांचगाव येथे उघडकीस आला आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असून विहिरगाव परिसरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

राजू डेंगरे यांच्या मालकीचा धाबा आहे. रात्री तीनच्या सुमारास धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. डेंगरे यांच्या हत्येनंतर आरोपींनी गल्ल्यातील पैसेही पळवले आणि गाडी घेऊन फरार झाले. मात्र पुढे आरोपींच्या गाडीचा अपघात झाला. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राजू डेंगरे यांचा विजय झाला होता. ते नागपूर ग्रामिणचे महामंत्री होते. डेंगरे यांच्या हत्येप्रकरणी कुही पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या हत्येची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)