Top News

नागपूर-चंद्रपूर मार्गावर चालत्या कारने घेतला पेट #chandrapur #fire


चंद्रपूर:- नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी ते टोलनाक्याच्या मधात चंद्रपूर वरुन कोंढाळी येथे जात असलेल्या चालत्या कारने अचानक पेट घेतला यावेळी हि बाब कारमध्ये बसून असलेल्या व्यक्तीच्या लक्षात आल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली तर कारची राखरांगोळी झाली.

प्राप्त माहितीनुसार नुकसान ११ डिसेंबरला सायकांळी ७.३० वाजताच्या सुमारास कोंढाळी येथिल आशिष तुळशीराम वाघाडे हे आपल्या कार क्रमांक एम.एच.४० ए.सी ९३९८ ने चंद्रपूर वरुन कोंढाळीला जात असताना नंदोरी ते टोलनाक्याच्या मधात कारने अचानक पेट घेतला हि बाब लक्षात येताच आशिष वाघाडे, त्यांची पत्नी दोन लहान मुले कारचे खाली उतरताच आगीने रौद्ररूप धारण करून कारला आपल्या कवेत घेऊन राख केले. सुदैवाने हि बाब लक्षात आल्याने कार मध्यील ४ व्यक्ती थोडक्यात बचावले या आगीत ८ लाख रुपये किंमतीची कार जळ राख झाली.

घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी अमोल वाघमारे, प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला हि कार शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पुढिल तपास पोलीस करीत आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने