चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद #chandrapur #Gondpipari


चंद्रपूर:- मागील महिन्यापासून गोंडपीपरी तालुक्यातील वेजगाव येथे बिबट्याची दहशत होती. अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.


वेजगाव परिसरात मागील एक महिन्यापासून बिबट्याची चांगलीच दहशत पसरली होती. शेतीवर जाणे बंद होते. रात्री गावात येऊन बकरी, कुत्र्याची बिबट्याने शिकार केली होती. वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन परिसरात तीन पिंजरे लावलेले होते.


वनपरिक्षेत्राधिकारी शेषराव बोबळे यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहायक झाडे,वनरक्षक प्रशांत मडावी,दीपक कुलमेथे, पीआरटीचे सुरक्षा रक्षक हे स्थानिक लोकांच्या मदतीने रात्र - दिवस गस्त करीत होते. दरम्यान शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गावाबाहेर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. याची माहिती मिळताच वनकर्मचारी, पोलीस पोहचले आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने