Top News

शिक्षक भरतीच्या लढ्यात वनमंत्र्यांची उडी #chandrapur #nagpur #gadchiroli

चंद्रपूर:- या ना त्या कारणाने रेंगाळलेल्या शिक्षक भरतीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.शिक्षक भरतीच्या प्रश्नावर झटणाऱ्या अभियोग्यताधारकाशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्यातील विविध शासकीय व खासगी संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.राज्यात शिक्षकांच्या ७० हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यापैकी ८० टक्के पदभरतीला मान्यता सुद्धा मिळाली आहे. शिक्षक पात्रता परिक्षा, अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी या दोन्ही परिक्षा घेण्यात येवून त्याचा निकाल सुद्धा लागला आहे.जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटला तरी जाहिरातीचा पत्ता नसल्याने अभियोग्यताधारक संदीप कांबळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शिक्षकभरतीसंदर्भात रान पेटवले. राज्यभरातून प्रतिसाद सुद्धा मिळाला.मध्यंतरी उमेदवारांनी हिवाळी अधिवेशनावर प्रत्येक जिल्हाधिकारी, शिक्षण आयुक्त कार्यालयावर उपोषण सुद्धा केले होते. २०१७ च्या मागासवर्गीयांच्या ५० टक्के जागा कपात व शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासाठी शिक्षण आयुक्त, पुणे कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण ११ दिवस केले होते.


शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळावी म्हणून कोरोनाकाळात संभाजीनगर ते मंत्रालय असे २२ दिवस लॉँगमार्च काढण्यात आला होता. या सर्व आंदोलनाची दखल घेवून संबधित अभियोग्यताधारक संदीप कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षकभरतीचा तिढा समजून घेतला. निश्चितच सरकारकडून विलंब होत असल्याचे मान्य करून शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात येवून तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.काय झाले बोलणे


जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका व खाजगी अनुदानित संस्था (इयत्ता ९ वी ते १२ वी) मधील शिक्षकांच्या रिक्त जागा आचारसंहितेपूर्वी एकाच टप्यात भरण्यात येतील.


जास्तीत जास्त पदाची जाहिरात देण्यासाठी व राज्यातील पालकांना, शाळांना व बेरोजगार अभियोग्यताधारकांना न्याय मिळवून देणार


याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त यांच्यासोबत विशेष बैठकीचे आयोजन करून सविस्तर चर्चा घडवून आणत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल.


राज्यात शिक्षकांच्या ७० हजाराहून अधिक रिक्त जागा असून त्यापैकी ८० टक्के पदभरतीला मान्यता मिळाली आहे. ही पदे भरण्यासाठी वने, सांस्कृतिक व मत्स्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे.


वनमंत्री मुनगंटीवार यांनी पदे तात्काळ भरण्याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.यापूर्वी सुद्धा खाजगी संस्थेला व शिक्षणसम्राटांकडून होणाऱ्या आर्थीक पिळवणूकीला लगाम लावण्यासाठी पवित्रपोर्टल तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कार्यान्वीत केले आहे. आजही खाजगी संस्थेवर एक रुपयाही न देता गरीबाचं लेकरू शिक्षक म्हणून रुजू होतंय यापेक्षा अजून काय हवं.
संदीप कांबळे, अभियोग्यताधारक

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने