बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल ऐवजी दारू! #Chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0


पोरांचा जुगाड पाहून पोलिसही चक्रावले


चंद्रपूर:- बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल ऐवजी दारू भरण्यात आली आहे. बाईकद्वारे दारू तस्करी करण्यात येत होती. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलिसांनी बाईक पकडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या या अजब दारु तस्करीची चंद्रपुरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आहे. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशाच दोन बहाद्दर युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या लपवल्याचे आढळले आहे. दोन आरोपी चामोर्शी येथे मोटरसायकलने दारूची वाहतूक करत होते. याची कुणकुण लागताच पोलिसांनी चामोर्शीतील जुन्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाजवळ सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले.



बाईकच्या पेट्रोल टँकमधून एकामागोमाग एक दारूच्या बाटल्या निघतच असल्याने टँकमध्ये पेट्रोल आहे की नाही, आणि नसेल तर गाडी चालत कशी होती, असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पेट्रोल टँक गाडीच्या सीटखाली बनवण्यात आल्याचे दिसून आले. पेट्रोल पुरवठ्याचा पाईप तेथून इंजिनला जोडलेला होता. दारूची वाहतूक करण्यासाठी या बहाद्दरांनी लढविलेली ही शक्कल पाहून चामोर्शी ठाण्याचे पोलिसही चक्रावून गेले. बाईक आणि दारूच्या बाटल्या जप्त करून दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)