Top News

तिसऱ्या दिवशी पोलिसांनी पांगवून लावला ठिय्या आंदोलन #chandrapur #pombhurna

३० लोकांना घेतले ताब्यात; ३०७ व ३५३ चे गुन्हे रद्द करण्यासाठी होते आंदोलन

पोंभूर्णा:- धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर झालेल्या मागील आंदोलनात आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेले कलम ३०७ व ३५३ मागे घेण्यात यावे या प्रमुख मागण्यांना घेऊन पोंभूर्णा पोलिस स्टेशन समोर सोमवार पासून सुरू असलेला ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी साडे अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी हाणून पाडला.यावेळी ३० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.दरम्यान काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.


धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करू नये व ईको-पार्कमध्ये आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.त्या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ३०७ व ३५३ कलम मागे घेण्यात यावे यासाठी शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी सोमवारला मोर्चा काढला होता.मोर्च्याचे रुपांतर पुढे ठिय्या आंदोलनात झाले.आंदोलकांनी सोमवारी तहसील कचेरीवर व मंगळवार पासून पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू होते.बुधवारी दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान प्रकरण चिघळणार असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी जुन्या गुन्ह्यातील ४ लोकांना व आंदोलनातील २६ लोकांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

यावेळी पोलिसांनी ३७ व ईतर २५ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचेवर कलम १४१, १४३, १४७, १४९, ३४१, ३५३, १०९, १८८ व भादवी सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयातील आंदोलना दरम्यान जगन येलके व ईतर १२ लोकांवर ३०७ व ३५३ व विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यातील चार लोकांना पोलिसांनी आंदोलनस्थळी ताब्यात घेतले.

यात गणेश परचाके,दर्शन शेडमाके,कांताबाई मडावी, दिनेश गेडाम यांचा यात समावेश आहे.सदर अटकेतील चारही आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.उर्वरीत ९ लोकांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने