कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
१४२ रूपये वाढ; पहिल्या शेतकऱ्याचा केला सत्कार
पोंभूर्णा:- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पोंभूर्णा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती रवींद्र मरपल्लीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर धान खरेदी केंद्राचे विधिवत शुभारंभ करण्यात आले. सभापती रविंद्र मरपल्लीवार,उपसभापती आशिष कावटवार व उपस्थित संचालक यांच्या हस्ते फित कापून, काटा पूजन करुन धान मोजणीला सुरुवात करण्यात आली.पहिला शेतकरी मसराम कुभरे रा.झुलूरवार तुकुम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी संचालक वसंत पोटे, अशोक साखलवार,प्रवीण पिदुरकर,वासूदेव पाल, धनराज सातपुते, प्रफुल लांडे, भारतीताई बदन, सुंनदाताई गोहणे, व प्रभारी सचिव लीलाधर बुरांडे व आदी कर्मचारी, शेतकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.मागच्या वर्षीप्रमाणेच हेक्टरी ३० क्विंटल धान खरेदी-विक्रीची मर्यादा असून प्रति क्विंटल २ हजार १८३ रुपये भाव देण्यात येईल, अशी माहिती या वेळी एल.पी.बुरांडे यांनी दिली.

 धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून सर्व धानाची आवक सुरु झाली आहे. यंदाची धान खरेदी आॅनलाईन पद्धतीने झाली असून प्रत्येक शेतकऱ्यांचा सातबारा प्रथम नोंदणी झाल्यावर तो शेतकरी विक्री मर्यादेनुसार आपले शेतमाल ३१ जानेवारी पर्यंत विक्री करु शकतो असे सचिव लीलाधर बुरांडे यांनी सांगितले आहे.