Top News

खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या 'J पॅलेस बार'चा परवाना रद्द करा #chandrapur #Korpana


ग्रामीण पत्रकार संघ चे तालुका अध्यक्ष यांची मागणी

(शहरात खोटे शिक्के व सह्या करणारी टोळी सक्रिय.?)
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागात विराजमान कोरपना तालुक्यातील औद्योगिक व मोठी बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरात हल्ली खोटे शिक्के,खोट्या सह्या करणारी टोळी सक्रिय असल्याची शंका आहे.रितसर व सरळ पद्धतीने न होणारा एखादा काम ही मंडळी चक्क डुप्लिकेट शिक्के व सह्या करून मार्गी लावत असल्याची गंभीर व धक्कादायक बाब गडचांदूर शहरातील एका प्रतिष्ठित,राजकीय पुढाऱ्याच्या प्रकरणातून समोर आली आहे.सदर व्यक्तिने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारातून कधीच न होणारे काम,या टोळीकडून 'फत्ते' करून घेत शासन-प्रशासनाची फसवणूक केल्याचे (RTI)माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येत आहे.
सदर प्रकरणी सविस्तर असे की,गडचांदूर नगरपरिषदेत उपाध्यक्ष,अशा महत्त्वाच्या पदावर विराजमान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(AP)राजुरा विधानसभा प्रमुख 'शरद सुरेश जोगी' यांनी गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील,कोरपना मार्गावरील शेत सर्व्हे नंबर 278/1क,कृषक शेती 2021 साली देवाळकर यांच्याकडून पत्नी सौ.रिता शरद जोगी,यांच्या नावाने खरीदी केली.त्यातील काही जागेवर बांधकाम करून मागील 28 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्याच पक्षाच्या एका नेत्याच्या वाढदिवशी 'जे-पॅलेस'(परवाना कक्ष FL-3)नावाचा 'बार & रेस्टॉरंट,लॉज' सुरू केला आहे.वास्तविक पाहता यात काहीही गैर नाही,व्यवसाय करण्याचा सर्वांना अधिकार आहे,शहरात असे अनेक बार अस्तित्वात आहे,यांनी बार सुरू केले तर काय बिघडले.असं प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे.मात्र,इतरांपेक्षा जोगी यांच्या बारचा प्रकरण काहीसा वेगळं आहे.एकतर यांनी कृषक शेतीला अकृषक न करता फक्त तत्कालीन तहसीलदार वाकलेकर,यांनी केलेल्या शासकीय चालान भरून तसेच नगरपरिषदेची रितसर परवानगी न घेता,देवाळकर यांनी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना 2009 मध्ये घेतलेल्या बांधकाम परवानगीच्या आधारे 2022-23 मध्ये इमारतीचे बांधकाम केले.(ग्रामपंचायत विसर्जित होऊन 2014 ला नगरपरिषदेची स्थापना)परवानगी देताना ग्रामपंचायतने म्हटले होते की,'एका वर्षात बांधकाम न केल्यास परवानगी रद्द होईल' असे प्राप्त पत्रात नमूद आहे.
दुसरे म्हणजे,जोगी यांनी बारचा परवाना मिळविण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात खोटी कागदपत्रे सादर केल्याची बाब{RTI} माहितीच्या आधारे प्राप्त कागदपत्रांवरून सिद्ध होते.यातील मुख्य म्हणजे जोगी यांनी इंजिनिअरने जे दिलेला 'पुर्णत्वाचा प्रमाणपत्र {Completion Certificate} जोडला आहे.तो पूर्णतः खोटा आणि बनावटी आहे.प्रमाणपत्र देणाऱ्या इंजिनीअरचा 11डिसेंबर 2006 रोजी निधन झाला आहे.असे असताना मात्र,त्या इंजिनीअरने 30 जुलै 2011मध्ये पुर्णत्वाचा प्रमाणपत्र Completion Certificate जोडलेला आहे.आता प्रश्न पडतो की,ज्या व्यक्तीचा 2006 मध्ये निधन झाला,तो 2011 म्हणजे,तब्बल 5 वर्षांनंतर प्रमाणपत्र कसं काय देऊ शकतो ? खात्री करून घेण्यासाठी जेव्हा हा प्रमाणपत्र सदर मयत इंजिनिअरच्या परिवाराला दाखवले तेव्हा त्यांनी याला सपशेल खोटा ठरवला.यावरून प्रमाणपत्रावरील शिक्का आणि सही खोटी असल्याचे स्पष्ट होते.यामुळे खोटे शिक्के आणि खोट्या सह्या करून प्रमाणपत्र देणारी टोळी शहरात सक्रिय असल्याची बाब नाकारता येत नाही.? ती टोळी कदाचित नगरपरिषदेतच सक्रिय नाही ना ? अशी शंका आहे.एकुणच जोगी यांनी 'जे-पॅलेस' बारचा परवाना शासनाची दिशाभूल करत खोट्या कागपत्रांच्या आधारे मिळवल्याची गंभीर बाब 'माहितीच्या आधारे' मिळालेल्या कागदपत्रांवरून सिद्ध होत आहे.जोगी यांना बारचा परवाना देताना नियमानुसार कागदपत्रांची व्यवस्थितपणे तपासणी व शहानिशा केली नसल्याची शंका असून सदर प्रकरणातील कागदपत्रांची सखोल चौकशी करून बारचा परवाना रद्द करून 'J पॅलेस' बार मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष,पत्रकार सैय्यद मुम्ताज़ अली यांनी उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक चंद्रपूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर,पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार,आमदार सुभाष धोटे,आमदार किशोर जोरगेवार यांनीही निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी पुढे काय,काय घडामोडी घडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने