Top News

नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाकरिता शिवाजी महाविद्यालयातील राधिका दोरखंडे ची निवड

चंद्रपूर जिल्ह्यातून तीन स्वयंसेवकांची निवड.

राजुरा:- नेहरू युवा केंद्र संघटना च्या वतीने 27 वी नॅशनल युथ फेस्टिवल राष्ट्रीय युवा महोत्सव  दि.१२ ते १६ जानेवारी ला नाशिक येथे संपन्न होत असून त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील तीन स्वयंसेवकांची निवड झालेली आहे. यामध्ये राजुरा येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी राधिका अविनाश दोरखंडे आहे.  तर इतर दोन विद्यार्थी  निखिल भडके साहिल सोनवणे नाशिक येथे रवाना झाले आहे.  


या शिबिरात देशभरातून जवळपास सात हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे. नेहरू युवा केंद्र भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्य करीत आहे . युवा दिनाच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून युवकांना मार्गदर्शन मिळणार असून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर प्रेरणादायी ठरणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी निवड झाल्याबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम.वरकड, उप प्राचार्य डॉ.राजेश खेरानी, प्रा.बी.यू. बोर्डेवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे , सचिव बादल बेले, प्रा.सुयोग साळवे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने