गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर भीषण अपघात #chandrapur #gadchiroli #accident


भरधाव दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, 3 तरुण ठारगडचिरोली:- राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास आल्यापासून वाहने सुसाट पळविली जात आहेत. या सुसाट वेगाने तीन तरुणांचा बळी घेतल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावाजवळ घडली.अक्षय दसरथ पेंदाम (वय 23), अजित रघू सडमेक (वय 23), अमोल अशोक अर्का (वय 20, सर्व रा. गोविंदगाव ता. अहेरी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिन्ही तरुण दुचाकीने सुसाट वेगाने गडचिरोलीकडे येत असताना ट्रकला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अक्षय, अजित, अमोल हे तिघेही नव्या दुचाकीने बुधवारी रात्रीच्या सुमारास गडचिरोलीकडे येत होते. मुरखळा नजीकच्या वळणावर भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने समोरुन येत असलेल्या ट्रकला धडक दिली. यात तिघेही जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी जागीच चक्काचूर झाली.दरम्यान, ट्रक चालकाने स्वतःच गडचिरोली पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतक तरुणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने