वनरक्षक परीक्षेत ५४ मार्क अन् तलाठी परीक्षेत २०० पैकी २१४?

Bhairav Diwase

तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती सोशल मीडिया माध्यमांतून समोर आली तसेच विद्यार्थ्यांनी आरोप करीत आहेत. या परीक्षांच्या भरतीसाठी मोठा घोळ असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सींकडून हे टेंडर काढून घेण्याची मागणीही उमेदवारांकडून होत आहे.


त्यातच, नुकतेच तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हाती आला असून या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील एका उमेदवाराला २०० पैकी तब्बल २१४ मार्क पडल्याने या परीक्षा व तपासणीतील भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे. त्यानंतर, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने याकडे शासनाचे लक्ष वेधले असून, याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली आहे.
हे दोन निकाल पाहा

एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त १५-२० दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये ५४ मार्क आणि तलाठी मध्ये २०० पैकी २१४ मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून होत आहे.

या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे, यांचे आधीचे मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे.

गुणवत्ता यादीत गडबड असल्याचा संशय

महसूल विभागाच्या भूमिअभिलेख विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये काही उमेदवारांना 200 हून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे या गुणवत्ता यादीत गडबड असल्याचा संशय काही उमेदवारांनी घेतला आहे.