Top News

बंदुकीच्या धाकाने पेट्रोलपंपावर धाडसी दरोडा #chandrapur #Rajura #chandrapurpolice


सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांचा शोध; 5 आरोपींना अटक


चंद्रपूर:- पेट्रोलपंपावरील सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून चावी हिसकावून एक लाख ९० हजार रुपये पळविल्याची घटना राजुरा वरुर रोडवरील साईकृपा पेट्रोलपंपावर घडली. या घटनेने शहरात दहशत पसरली आहे. पाचहीजण सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती आहे.

5 आरोपींना अटक

राजुरा शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर दिनबाग तांडा यांच्या मालकीचे साईकृपा पेट्रोलपंप आहे. ६ जानेवारीला रात्रीपासून सुरक्षारक्षक तैनात होता. दरम्यान, पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच व्यक्ती अचानक पंपावर आले. बंदुकीचा धाक दाखवून तेथील सुरक्षारक्षकाकडून चावी हिसकावली; तसेच पंपावरील विक्रीची एक लाख ९० हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. पेट्रोलपंपावरील व्यवस्थापकाने पोलिस स्टेशनला माहिती दिली.

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, राजुरा येथील पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, विरूर स्टेशनचे पोलिस निरीक्षक निर्मल जयप्रकाश यांनी घटनास्थळाला भेट दिली. सीसीटीव्ही चेक केला.


यावेळी २० ते २५ वर्षांच्या आतील पाच तोंडाला पट्टे बांधून, हातात शस्त्र घेऊन आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी केली. अज्ञाताविरुद्ध कलम ३९५, ३९८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फूटेजवरून पोलिसांनी शोध घेत 5 आरोपींना अटक अटक करण्यात आली. पुढील तपास विरुर स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने