Click Here...👇👇👇

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाला सुविधा द्या.

Bhairav Diwase
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाला सुविधा द्या.

श्रीगुरुदेव सेवा मंडळ राजुरा ने नगर परिषद ला निवेदनाव्दारे केली मागणी.


राजुरा:- राजुरा शहरातील साईनगर भागात स्थानिक विकास निधी अंतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सभागृह बांधण्यात आले व लोकार्पण होवून श्रीगुरुदेव सेवा मंडळ राजुरा तालुका कार्यकारीणी कडे सुपूर्द करण्यात आले.सदर सभागृहात श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे थोरपुरुषांची जयंती,पुण्यतिथी आदी विविध समाजपयोगी उपक्रम नियमितपणे राबविले जातात तसेच दर शुक्रवारी सेवक,प्रचारक मंडळी सामुदायिक प्रार्थना करीत असतात. सदर सभागृहात रंगरंगोटी व इलेक्ट्रिक चे कामे श्रीगुरुदेव सेवा मंडळाने केलेली आहे परंतु सभागृहात पिण्याचे पाणी ची सोय,कूपनलिका, शौच्छालय मुत्रीघर आदी मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे अडचण निर्माण झालेली आहे, सदर आवश्यक गरजांची पुर्तता करणे करीता मुख्याधिकारी न.प.राजुरा यांचे वतीने श्री.अक्षय सुर्यवंशी प्रशासकीय अधिकारी न.प.राजुरा यांना ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य,बळीराम बोबडे,बाळा गोहोकर,सुरेश बोंडे,अनिल चौधरी,उत्तम अवघडे,प्रल्हाद उईके,गजेंद्र ढवस,सुभाष पावडे मनोहर बोबडे,शैलेश कावळे,लता ठमके,निर्मला उराडे,लक्ष्मी गेडाम,शशिकला बोबडे,कुसुम हेपट,बेबी कुत्तरमारे,शिला भगत,कमल भोजेकर यांनी मागणीचे निवेदन सादर केले व संबंधीत विषयावर चर्चा केली.