कोरपना:- माणिकगड सिमेंट कंपनी व बालाजी मार्केटिंग ने 42 कामगारांना दोन तीन महिन्या पासून कामावरून काढले होते सर्व कामगारांनी प्रहरच्या जिल्हा अध्यक्ष बिडकर यांची भेट घेऊन कामावर लावून न्याय मिळवून देण्याची विनंती केली बिडकर यांनी पत्र व्यवहार करून कंपनी व ठेकदाराला विनंती निवेदन दिले पण त्याचा काही ही फायदा झाला नाही शेवटी कामगारांना घेऊन प्रहार ने आंदोलन केले व आंदोलनाला यश आले सर्व कामगारांना परत कामावर घेण्यात आले तेच औचित्य साधून सर्व कामगारांनी रक्तदान शिबिर ठेवले व रक्तदान करून कंपनीचे व बालाजी मार्केटिंग ठेकेदाराचे आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कंपनीचे पाठक तर उद्घाटक म्हणून प्रहार चे जिल्हा अध्यक्ष बिडकर प्रमुख पाहूने ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रवीण येरेम, पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे साहेब, बालाजी मार्केटिंग चे कालबे, प्रहरचे शैलेश विरुटकर प्रहार दिव्यांग जिल्हा अध्यक्ष पंकज माणूसमारे होते प्रहार शहर अध्यक्ष आशिष आगरकर उपस्थितीत होते.
कामगारांनी रक्तदान करून कंपनीचे आभार मानले त्यात कामगारांचा उस्ताह वाढवा म्हणून बिडकर यांनी सुद्धा 23 व्या वेळी रक्तदान केले जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग म्हणाला हरकत नाही की कुणी रक्तदान करून आभार मानत आहे असे बिडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हंटले.
रक्ताचा तुटवडा नेहमीच असतो जो पर्यंत कुणाच्या नातेवाईकाला रक्ताची गरज भासत नाही तो पर्यंत त्यांना रक्ताची गरज कळत नाही जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे डॉ येरमे यांनी म्हंटले आहे.
या वेळेस प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल पाचभाई, उपाध्यक्ष नंदकिशोर केळझडकर, रोहित सुरतेकर प्रवीण, योगेश ठाकरे शिंदे, किशोर टोंगे संजू गोडे, प्रशात बुरान, सुरज शेंडे, , रविंद्र वडस्कर, महेश सोयाम, सुरेश केंद्रे, अनिल तासलवार, विशाल कामडे विकास ठाकरे, मनोज जुनघरे, आकाश पथाडे, करण तलवार, धोडीबा काचगुंडे , करनु सिडाम, प्रकाश शेरकी, शनश्वर चिमनकर, रमेश उरकुडे, मंगेश शेळके, अश्विन वाघाडे, प्रमोद जुनाघर, अक्षय जानवे, वसंता कामडे, प्रमोद तिरणकर, राकेश उरकुडे,आकाश कीचेकर, भारत आगेकर, समाधान पिदुरकर, अविनाश वाघमारे, रणजित केलाझडकर, व अन्य कामगार उपस्थित होते.
यावेळेस 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून कंपनीचे आभार मानले. कधी काळी आपल्याच नातेवाईकाला रक्ताची गरज भासू शकते तुम्ही सुद्धा नक्की रक्तदान करा करत रहा असे आव्हान कामगारांनी केले रक्तदान हेच सर्व श्रेष्ठदान आहे