चंद्रपूर:- अयोध्येमध्ये भव्य प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. या निमित्याने संपूर्ण देश 'राम'मय झाल्याचे चित्र आहे.
अशातच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्र संपूर्ण जगाला कळावे यासाठी हे अक्षरी मंत्र तब्बल 33,258 दिव्यांनी सजविण्यात आले.
या आगळ्यावेगळ्या पद्धतीने भक्तीचा महोत्सवातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे नाव साता समुद्रापार पोहचविण्याचा विश्वविक्रम केला आहे. चांदा क्लब मैदानावर 100 चौरस फूट जागेवर "सियावर रामचंद्र की जय" हे 11 अक्षरी मंत्र साकारण्यात आले. त्यावर 33,258 दिव्याच्या पणत्या लावत चांदा क्लब मैदान परिसर प्रकाशमय करण्यात आले.
21 जानेवारीला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे पालकमंत्री मुनगंटीवार यांना नव्या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
सियावर रामचंद्र की जय हे 11 अक्षरी मंत्राला 30 हजार दिव्यांनी प्रकाशमय करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चंद्रपूरचे नाव नोंदविले गेले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा भव्य कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाने आयोजित केला होता.