Top News

प्रेमात धोक्‍याने दु:खी प्रेयसीने संपवले जीवन; युवकाला अटक #chandrapur #gadchiroli #suicide


गडचिरोली:- दोन वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध नाकारुन लग्नास विरोध केला म्हणून दु:खी झालेल्या प्रेयसीने जीवन संपवले. तर दुसऱ्याच युवतीशी लग्न करु पाहणाऱ्या युवकास साक्षगंधापूर्वीच पोलिसांनी बेड्या घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगेश सुरेश चौधरी (वय २८) रा.रामपूर,ता.आरमोरी, असे अटकेतील युवकाचे नाव आहे.

मृत युवती आरमोरीतील एका महाविद्यालयात बीए प्रथम वर्षात शिकत होती. ट्रॅक्टर चालक असलेल्या मंगेशशी तिचे प्रेम जुळले. पाहतापाहता दोन वर्षे उलटले. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. अशातच मंगेशचे लग्न दुसऱ्या युवतीशी जुळले. ही बाब कळताच मंगेशच्या प्रेयसीचे अवसान गळाले. तिने त्याला जाब विचारला. मात्र, मंगेशने तिला नकार देऊन दुसऱ्या युवतीशी लग्न ठरल्याचे सांगितले.

पुढे प्रेयसी युवतीने १८ जानेवारीला आरमोरी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांनाही समोरासमोर बोलावले. मात्र, मंगेश दुसऱ्या युवतीशी लग्न करण्यावर ठाम राहिला. यामुळे दु:खी झालेली प्रेयसी घरी निघून गेली. १९ जानेवारीला त्या युवतीचे आईवडील आरमोरीच्या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी, तर भाऊ शेळ्या चारण्यासाठी गेला होता. ही संधी साधून प्रेयसी युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसरीकडे मंगेशचा साक्षगंध दुसऱ्या युवतीशी २१ जानेवारीला होणार होता. मात्र, प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर साक्षगंधापूर्वीच पोलिसांनी मंगेशला कारागृहाची हवा दाखवली. आरमोरी पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने