Top News

देवराव भोंगळे नी केला पत्रकारांचा सन्मान #chandrapur #Korpana


पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा 'सन्मान सोहळा:- देवराव भोंगळे
कोरपना:- आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील दिन,दुर्बल,शोषीत लोकांना न्याय देण्याचे काम,हे आपले पत्रकार बांधव करतात.आपण बघतो की,एखादी बातमी सर्वांना आवडत असली तरी ती एखाद्याला जिव्हारी सुद्धा लागते,ही सर्व तारेवरची कसरत पत्रकार बांधवांना करावी लागते.दर्पणकार जांभेकरांनी,जी पत्रकारीतेची सुरुवात केली,ते वृत हातात घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी पत्रकार काम करतात.शासन-प्रशासनावर अंकुश ठेवत,समाजातील ज्वलंत प्रश्न असतात, ते सोडवण्यासाठी आमचा पत्रकार बांधव काम करतो,या प्रकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सन्मान,सत्कार सोहळा आयोजित केला आहे.या निमित्ताने आम्हाला पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल 'सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र' व 'गडचांदूर भाजप' पदाधिकाऱ्यांच्या वतीने समस्त पत्रकार बांधवांचे अगदी मनापासून आभार मानतो" असे मौलिक मत राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष 'देवराव भोंगळे' यांनी व्यक्त केले.

ते गडचांदूर येथील बस स्थानक परिसरात नवनिर्मित 'ना.सुधीरभाऊ सेवा केंद्र' कार्यालयात 9 जानेवारी रोजी गडचांदूर शहर भाजपातर्फे आयोजित 'पत्रकार सन्मान सोहळा' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,नगरगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,माजी नगराध्यक्षा तथा भाजपा जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ.विजयालक्ष्मी डोहे,जेष्ठ नेते महेशजी शर्मा, शिवाजी सेलूकर,महादेव एकरे,विश्वंबरजी झाम, हरीश घोरे,राकेश अरोरा,भोई समाज तालुकाध्यक्ष धर्मा वाघमारे,गोपाल मालपाणी,हितेश चव्हाण, यांच्यासह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच नगरसेवक रामसेवक मोरे यांचा वाढदिवस असल्याने सर्वांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा वाढदिवस सुद्धा यानिमित्ताने साजरा करण्यात आला.गडचांदूर येथे पहिल्यांदाच एवढ्यामोठ्या प्रमाणात पत्रकारांचा सत्कार सोहळा घेतल्याबद्दल पत्रकार बांधवांनी गडचांदूर शहर भाजपचे आभार मानले आहे.सदर सोहळ्यात गडचांदूर विभागातील पत्रकार बांधव, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने