16 बंडखोर आमदार ठरले पात्र, नार्वेकरांचा मोठा निर्णय
मुंबई:- राज्याच्याच नव्हे तर देशासाठीही महत्वाचा असणारा शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर आज जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले आहेत. त्यामुळं राज्याच्या राजकारणातील स्थिती जैसे थे आहे.
आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० मिनिटांनी सुरुवात होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र या अपेक्षित वेळेपेक्षा ४५ मनिटे उशिरा नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर एक तासाहून अधिक काळ निकाल वाचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला.
निकालापूर्वी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा पार पडली. त्यानंतर नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानले. तसेच ज्यांनी आपल्याला या कामात मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आणि त्यांच्या वकिलांचे देखील नार्वेकरांनी यावेळी आभार मानले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं. तसेच या शिवसेनेनं नेमलेला व्हिप भरत गोगावले हेच अधिकृत व्हिप म्हणूनही त्यांनी मान्यता दिली.
सविस्तर माहिती थोड्याच वेळात...