Top News

नारंडा येथे विकसित भारत संकल्प यात्रा #chandrapur #Korpana



कोरपना:- कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा येथे केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी विकसित भारत संकल्प यात्रा नारंडा येथे उत्साहात संपन्न झाली.


यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुताई वसंतराव ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनुताई ताजने, प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बाळा पावडे, पोलीस पाटील नरेश परसुटकर, युवा नेते आशिष ताजने, ग्रामसेवक महेशकुमार जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ.दीक्षा ताकसांडे, मुख्याध्यापक गुंडावार सर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी लांडे,कृषी सहाय्यक राठोड,ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,ज्येष्ठ नागरिक नागोबा पाटील उरकुडे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती गावातील नागरिकांना देण्यात आली.प्रधानमंत्री घरकुल योजना,प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना,प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना,प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना,जल जीवन मिशन योजने अंतर्गत हर घर-जल योजना याबाबत लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.
तसेच गावातील लाभार्थ्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले प्रधानमंत्री घरकुल योजना कोरपणा तालुक्यातील उत्कृष्ट घर बांधकाम केल्याबद्दल तुळशीराम काळे यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी गावातील नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती रथातून चित्रफितीद्वारे देण्यात आली.यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद खाडे व आभार प्रदर्शन ग्रामसेवक महेशकुमार जगताप यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने