Top News

जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गिरीश मार्लीवार तर सचिवपदी ॲड. अविनाश खडतकर विजयी.

जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गिरीश मार्लीवार तर सचिवपदी ॲड. अविनाश खडतकर विजयी


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत ॲड. गिरीश मार्लीवार यांची अध्यक्ष तर सचिवपदी ॲड. अविनाश खडतकर हे विजयी झाले. २० जागांपैकी ॲड. गिरीश मार्लीवार यांच्या पॅनलला १३ जागा मिळाल्या. तर ॲड. रवींद्र रंगारी यांच्या पॅनलला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. महिला राखीव गटातील तीनही जागा मार्लीवार पॅनलच्या पारड्यात पडल्या आहे. रविवारी पहाटेपर्यंत मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.

चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून डावे-उजवे असा संघर्ष बार असोसिएशनच्या निवडणुकीत बघायला मिळत आहे. ६४० मतदारसंख्या आहे. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ मनोज काकडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम सांभाळले. ॲड. रवींद्र भागवत, ॲड. विजय मोगरे, ॲड. प्रशांत खजांची, ॲड. प्रकाश सपाटे, ॲड. वामन लोहे यांच्या मार्गदर्शनात ॲड. गिरीश मार्लीवार यांच्या नेतृत्वात पॅनल उभे करण्यात आले. तर ॲड. दत्ता हजारे, ॲड. सुनील पुराणकर यांच्या मार्गदर्शनात ॲड. रवींद्र रंगारी यांच्या नेतृत्वात पॅनल तयार करण्यात आली. अध्यक्षपदासाठी ॲड. गिरीश मार्लीवार आणि ॲड. रवींद्र रंगारी यांच्यात लढत झाली. त्यात मार्लीवार यांनी बाजी मारली. मार्लीवार यांच्या पॅनलला महत्त्वाचे सचिवपद गमवावे लागले. रंगारी पॅनलचे ॲड. अविनाश खडतकर हे सचिवपदी विजयी झाले. उपाध्यक्ष पदी मार्लीवार पॅनलचे ॲड. मलिक शाकीर, सहसचिव पदी ॲड. स्वर्निश घोडेस्वार, कोषाध्यक्ष पदी ॲड. आशिष गुप्ता तर ग्रंथपाल पदी रंगारी पॅनलचे ॲड. श्यामसुंदर नागतुरे विजयी झाले. महिला राखीव गटाच्या तिनही जागा मार्लीवार पॅनलने जिंकल्या. यामध्ये ॲड. मोनाली बल्लावार, ॲड. वेदश्री बत्तुलवार, ॲड. स्नेहल कन्नाके यांचा समावेश आहे. सदस्यांमध्ये मार्लावार पॅनलचे ॲड. अशोक चनकापुरे, ॲड. अक्षय गेडाम, ॲड. दीशा गोवर्धन, ॲड. वसीम खान, ॲड. सतिश मसादे, ॲड. अश्विनी मोगरे तर रंगारी पॅनलचे ॲड. विद्या मोरे, ॲड. मनीष काळे, ॲड. भीमराव आमटे, ॲड. रमण पुणेकर, ॲड. सुधीर पेंदोर यांनी बाजी मारली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने