(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- एकाच आठवड्यात पोस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी दोघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.
पहिल्या घटनेत नवव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या विवाहित एसटी बस वाहका विरुद्ध गडचांदूर पोलिसात पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिवती तालुक्यातील एका १४ वर्षाची विद्यार्थिनी गडचांदूर येथे शिकत आहे. ती दररोज एसटीने यायची, एसटी बस वर वाहक म्हणून असलेला मुनीर सादिक शेख हा तिच्या सोबत तथाकथितपणे नेहमी बोलत असल्याने त्यांची ओळखी वाढली. काही दिवसानंतर मुनीर ने तिला प्रपोज केले. मात्र त्या विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. मात्र शाळेत एसटी बसने येणे जाणे करावे लागत असल्याने दोघात बोलचाल व्हायची. एकेदिवशी तो तिला भेटासाठी शाळेकडे दुचाकी घेऊन आला. दि. १० ला दुपारी लवकर सुट्टी झाली आणि तो शाळेजवळ दुचाकी घेऊन मुलीची वाट पाहत उभा होता. शाळेला सुट्टी होताच त्याने तथाकथितपणे मुलीला दुचाकीने सोडण्याच्या बहाण्याने बसविले दोघेही विसापूर मार्गे जात असल्याचे गावातील नागरिकांना दिसले. याबाबत मुलीच्या आईला माहित होताच गडचांदूर पोलीस ठाणे गाठून एक विवाहित पुरुष माझ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक करीत असल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. पोलिसांनी आरोपी मुनीर सादिक शेख (३२) याला अटक केली असुन त्याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसऱ्या घटनेत गडचांदूर येथील पुरस्कार प्राप्त आरोपी बॉडी बिल्डर अनीस खान (२८) याने सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे व्हिडीओ ठेऊन तिचा बद्दल आक्षेपार्ह लिहिले होते. काही दिवसानंतर त्याच्या मित्राने सोशल मीडियावर तेच व्हिडीओ पोस्ट केले. याबद्दल माहिती मिळताच पोलिसात तक्रार करण्यात आली. मित्राने व्हिडीओ अनीस खान याचे सोशल मीडियावरून घेतले असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बॉडी बिल्डर आरोपी अनीस खान (२८) याला अटक केली असुन त्याच्यावर आयटी एक्ट व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अनीस खान ला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला १५ दिवसाचा एमसीआर देण्यात आला.
एकाच आठवड्यात पोस्को अंतर्गत दोन गुन्हे दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या घटनेत पोलिसांनी दोघाही आरोपींच्यां मुसक्या आवळल्या आहे. महिलांच्या बाबतीत अश्या घटना घडत असताना नागरिकांत प्रचंड रोष असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.