चंद्रपूर:- जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सोमवारी जिल्ह्यातील तब्बल 65 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांचे खांदेपालट केले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन पोलिस निरीक्षक, 28 सहायक पोलिस निरीक्षक, 35 पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. सर्व राजकीय पक्ष, निवडणूक विभाग कामाला लागला आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने एका ठिकाणी तीन वर्षे, एकाच विभागात आठ वर्षे, तसेच जिल्ह्यात चार वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून जिल्ह्यातील बदलीपात्र पोलिसांना बदल्याचे वेध लागले होते. अनेकांमध्ये तर आपल्याला सोईच ठाणे वा शहर मिळावे, यासाठी स्पर्धा सुरू झाली होती. दरम्यान, रात्री जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मागील बऱ्याच दिवसांपासून रामनगर ठाण्यासह दुर्गापूर पोलिस ठाण्याचा प्रभार सांभाळणाऱ्या पोलिस निरीक्षक लता वाडिवे यांना दुर्गापूर येथे स्थायी करण्यात आले. तर जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांची नागभीड पोलिस स्टेशनला तर सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांची जिल्हा विशेष शाखेत तर गोंडपिपरीचे ठाणेदार जिवन राजगुरू यांची सावली पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.
माजरीचे ठाणेदार अजितसिंग देवरे तळोधीला, गोंडपिपरीचे ठाणेदार जिवन राजगुरू सावलीला, पडोलीचे एपीआय राजकिरण मडावी कोठारी, नागभीडचे ठाणेदार योगेश घारे विरुर स्टे, रामनगरचे एपीआय योगेश खरसान माजरीला, बल्लारपूरचे रमेश हत्तीगोटे गोंडपिपरी ठाणेदार, रामनगरचे योगेश हिवसे उमरी पोतदार ठाणेदार पदी, रामनगरचे सुधाकर कोकोडे पाटण, बल्लारपूर प्रोमद रासकर धाबा, सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर जिविशा, चंद्रपूर, धाबाचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत ब्रह्मपुरी, कोठारीचे विकास गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा, शेगावचे अविनाश मेश्राम मूल, रामनगरचे हर्षल एकरे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, भद्रावतीचे राहुल किटे नागभीड, ब्रह्मपुरीचे वैभव कोरवते रामनगर, नागभीडचे अनिल कुमरे गडचांदूर, ब्रह्मपुरीचे राजेश गावळे बल्लारपूरला, मूलचे सतीश बन्सोड रामनगरला, बल्लारपूरच्या प्राची राजुरकर ब्रह्मपुरी, भद्रावतीचे विशाल मुळे रामनगर, गडचांदूरचे प्रोमद शिंदे भद्रावतीला, जिविशाचे विजय रत्नपारखी दुर्गापूर, उमरी पोतदारचे किशोर शेरकी, स्थानिक गुन्हे शाखा, विरुरचे जयप्रकाश निर्मल वाहतूक शाखा, रामनगरच्या सपना निरंजने जिविशा, रामनगरचे अमरदीप खाडे जिविशाला बदली झाली आहे.
पाथरीचे पोलिस उपनिरीक्षक विजय खोब्रागडे पिट्टीगुडा, रामनगरचे चंद्रकांत लांबट तळोधीला, चंद्रपूर शहरचे दीपक चालुरकर शेगावला, वरोरा दीपक ठाकरे चिमूर, चिमूरचे भिष्मराज सोरते राजुरा, नागभीडचे प्रेमशहा सयाम बल्लारपूर, सिंदेवाहीचे भास्कर ठाकरे मूल, राजुराचे ओकप्रकाश गेडाम भद्रावती, पाटणचे शहाजी घोडके घुग्घुस, भरोसा सेलच्या अपेक्षा मेश्राम मूल, वरोराचे सचिन मुसळे सावली, गोंडपिपरीचे विजय मोगरे वरोरा, स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल कावळे रामनगर, रामनगरचे स्वप्नील गोपाले जिविशा, भद्रावतीचे अमोल कोल्हे जिविशा, राजुराचे महेश बोथल जिविशा, गडचांदूरचे निशा खोब्रागडे भरोसा सेल, मूलचे राजश्री रामटेके नियंत्रण कक्ष, रामनगरचे शेख शरिफ शेख मो नियंत्रण कक्ष, चंद्रपूर शहरचे गौरीशंनकर आमटे नियंत्रण कक्ष, वरोरा किशोर मित्तरवार नियंत्रण कक्ष, शेगाव महादेव सरोदे नियंत्रण कक्ष, ब्रह्मपुरीचे निशांत जुनोनकर नियंत्रण कक्ष, ब्रह्मपुरी संघमित्रा बांबोळे नियंत्रण कक्ष, टेकामांडवा संतोष चव्हाण नियंत्रण कक्ष, पिट्टीगुडा सशिल सरकार नियत्रण कक्ष, भारी लक्ष्मीकांत दुर्गे नियंत्रण कक्ष, सशस्त्र व पो. दुरक्षेत्र वणीचे पंकज हेकाड नियंत्रण कक्ष, चंद्रपूर शहर बाबा डोमकावळे नियंत्रण कक्ष, चंद्रपूर शहर विलास गेडाम नियंत्रण कक्ष, घुग्घुस अशोक बोडे वाफौ, कार्या. उविमपोअ, चंद्रपूर, भद्रावती उस्मान अली सैय्यद वा. चौ. कार्या. उविपोअ. वरोरा, तळोधी सहदेव गोवर्धन वाफौ. कार्या. उविपोअ. मूल, तळोधी भास्कर पिसे वाफौ. कार्या. उविपोअ. चिमूर, विरुर अजय मडावी वाफौ. कार्या. उविपोअ. राजुरा येथे बदली करण्यात आली आहे.