Click Here...👇👇👇

विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तणाव #chandrapur #mul

Bhairav Diwase
1 minute read
मुख्याध्यापकाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

चंद्रपूर:- चंद्रपुरात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुदानीत खाजगी जिजामाता निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला आहे. सहा दिवसांपासून या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचे लपवणाऱ्या मुख्याध्यापकाला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात चोप दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रम शाळेत विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू?

मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथे ही निवासी आश्रमशाळा आहे. अहेरी येथील मितल कोंडगुर्ले हिची प्रकृती खालावली असताना सहा दिवसांपासून पालकांना याची सूचनाच दिली नसल्याचे उघड झाले. अखेर रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर पालकांना माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला. रुग्णालयात दाखल असल्याचे व उपचार सुरू असल्याचा खोटा निरोप दिल्याने पालक भडकले. प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.