Top News

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी #chandrapur #Brahmapuri

सोनेगाव शेतशिवारातील घटना

ब्रह्मपुरी :- उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनेगाव गट क्रमांक ३५०मध्ये शेतात पर्‍याला पाणी करण्यासाठी गेलेल्या तेजराम सखाराम दर्वे वय (६०) वर्ष या शेतकऱ्यांवर अचानक रानटी डुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले आहे.घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली.त्यांना ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दिनांक २९ जानेवारीला सायंकाळी ४:३० वाजेच्या दरम्यान तेजराम दर्वे हे उन्हाळी धान फसलसाठी रोवलेल्या पऱ्याला पाणी करायला गेले होते. पर्‍याला पाणी देत असतांना तनसीच्या ढिगार्‍यात दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्या कानाला मानेला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना ब्रह्मपुरी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

घटने बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली असून ब्रह्मपुरी वन विभागात कार्यरत दक्षिण वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक सेमस्कर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने