Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रम शाळेत विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू? #Chandrapur #mul

मुल:-‌ मुल तालुक्यातील सुशी येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिनांक 29 जानेवारी ला घडली. कु. मित्तल केशव कोंडागुर्ले वर्ग सहावा राहणार मरपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेत विद्यार्थी निवासी राहतात. 31 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता नृत्याचे सराव सुरू होता यात मित्तल कोंडागलें ही सराव करीत असताना चक्कर आली व ती खाली कोसळली. तिला छातीत दुखत असल्याने शाळेचे चपराशी सोंडूले यांनी मूल उपजिल्हा रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. डॉक्टरांनी मित्तल ला मृत घोषित केले. परंतू हा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोले जात आहे. अद्याप मृत्यू कश्याने झाला हे स्पष्ट झालेले नाही. सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेच्या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने