"......तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू"; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा #chandrapur #pune



पुणे:- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती बाबत आरोप केला आहे. या परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याच त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली. ते रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट देण्यास आलेले तेव्हा बोलत होते.



तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने