Top News

एक शिक्षक चार वर्ग तरी सगळे गप्पचं? #Chandrapur #saoli


जि. प‌. शाळेचा कारभार चालत आहे एकाच शिक्षकावर
सावली:- तालुक्यातील गेवरा बुज जिल्हा परिषद शाळेचा कारभार एकच शिक्षक चालवित आहे . त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे.

गेवरा बुज येथे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता एक ते चार पर्यंत वर्ग आहेत. या चार वर्गाचा कारभार एक शिक्षिका चालवित आहेत. एक शिक्षिका चार वर्ग कसे काय सांभाळणार? आणखी त्यांचा वर्ग कसे घेणार? त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यास क्रमावर मोठा प्रभाव पडत असतानी दीसत आहे.
मात्र ना कुठला गाव प्रतिनिधी लक्ष देतोय? ना कुठले संबंधित अधिकारी?

चार वर्गापर्यंतची ४०-५० पटसंख्येच्या मानाने येथे शीक्षकाची गरज आहे . येथे अगोदर दोन शिक्षक होते एका शिक्षकाची बदली झाल्यामुळे येथे मात्र एकच शिक्षिका आहेत, तालुक्याच्या ठिकाणी काही कार्यालयीन काम असल्यावर शाळा बंद ठेऊन तिथे हजर रहावे लागते त्यामुळे वीद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणीक नुकसान होत आहे त्यामुळे सावली पंचायत समीती येथील शिक्षणाधिकाऱ्याने या समस्येची दखल घेऊन शिक्षकांची नियुक्ती करावी अशी विद्यार्थ्यांच्या पालकांकडुन मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने