Top News

ब्रह्मपुरी येथे कुणबी समाजाच्या उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन #chandrapur #Brahmapuri


ब्रम्हपुरी:- जवळपास बरेच समाज आप- आपल्या पर्यायी व्यवस्थेनुसार संघटित होताना आपण नेहमीच बघतोय; पण आपला समाज मात्र कित्येक दिवसापासून बरखटलेलाच आहे.

विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुणबी समाज बहुसंख्येने आहे. परंतु मात्र समाजाची प्रगती खुंटलेलींच दिसते. आता खऱ्या अर्थाने समाज बांधवांनी जागे होण्याची गरज आहे. आम्ही जर विचारात घेतलं तर आपल्या कुणबी समाजाचा निश्चितच आमदार होऊ शकतो. त्याकरिता संघटनात्मक बांधणीची गरज आहे. समाजातील एकमेका प्रती असलेले हेवेदावे विसरून समाजाच्या प्रगतीसाठी आपल्याला संघटित होण्याची खरी गरज आहे. तरच समाजाची संघटनात्मक बांधणी होईल. व निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मांडले. "त्या" ब्रह्मपुरी येथे अखिल कुणबी समाज मंडळ द्वारा आयोजित उपवधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी तथा मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
आयोजित कार्यक्रमास प्रामुख्याने उद्घाटक म्हणून खासदार सुनिल मेंढे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सुभाष धोटे होते. सत्कारमूर्ती म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार परिणय फुके, माजी आमदार सेवक वाघाये, जि.प. माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, सकाळचे पत्रकार प्रमोद काकडे, जिल्हा पणन अधिकारी विष्णू तिवाडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दामोधरजी मिसार, शिवतीर्थचे संचालक डॉ. अभिविलास नखाते, गडचिरोली काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, अस्थिरोगतज्ञ डॉ.सतीश दोनाडकर, माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे,दामोदर मिसार,ऋषी राऊत यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते

पुढे बोलतांना आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, कुणबी समाज हा सर्व क्षेत्रात प्रगतशील समाज म्हणून उभा झाला पाहिजे. समाजातील गरीब-श्रीमंत यामधील दरी मिटवून सामूहिक सोहळ्यातून समाजाला आर्थिकरित्या प्रगतशील बनविणे हे प्रत्येक समाज बांधवांची जबाबदारी आहे. समाजातील होतकरू हुशार अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहवे असे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती दूफारे यांनी प्रास्ताविक गोविंदराव भेंडारकर यांनी तर आभार मोंटु पिलारे व पाहुण्यांचा परिचय माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी करून दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने