Top News

पत्रकार संतोष पिलारे यांचा सत्कार #chandrapur #Brahmapuri

ब्रह्मपुरी:- ग्रामपंचायत कार्यालयातर्फे चौगान ग्राम जयंती महोत्सव 2024 चे आयोजन दिनांक 28 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.या प्रसंगी ब्रह्मपुरी दैनिक लोकमत समाचारचे प्रतिनिधी चौगान येथील रहिवासी पत्रकार संतोष पिलारे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्राम जयंती महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, ब्रह्मपुरी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र मेश्राम, माजी सभापती प्रणाली मैंन्द, माजी उपसभापती विलास उरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राऊत, राष्ट्रवादीचे नेते विनोद नवघडे, सरपंच उमेश धोटे, उपसरपंच अंकुश मातेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंडेल, ग्राम विस्तार अधिकारी चौधरी, किन्ही गावचे सरपंच धीरज गोपाल धोंगडे, रानबोथलीचे सरपंच लिंगायत, रनमोचन ग्रामपंचायतचे उपसरपंच सदाशिव ठाकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने