Click Here...👇👇👇

चंद्रपूर जिल्ह्यात इंधन भरण्यासाठी लोकांची पंपावर उसळली गर्दी #chandrapur

Bhairav Diwase
1 minute read



चंद्रपूर:- केंद्र सरकारने चालकाच्या हातून अपघात झाल्यास १० वर्षाची शिक्षा असा नियम आजपासून लागू केला आहे. या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांचे आंदोलन सुरु आहे. चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येत आहे. चालकांच्या हातून अपघात घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षाचा कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा ठेवण्यात येणार आहे. नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.




इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे चालकांकडून काम बंद पुकारण्याची शक्यता आहे. या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल, डिझेलसह, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असून, संप जास्त लांबल्यास जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल.


इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वत्र पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. आता बेमुदत संप केव्हा पर्यंत राहील या भीतीने जनतेची इंधन भरण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.