ग्रामीण भागातून पत्रकारिता क्षेत्रात आलेला भैरव #chandrapur



चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा या गावातील भैरव धनराज दिवसे हा एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा..... कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असल्याने भैरव आपल्या वाटेने आलेल्या संकटावर मात करून एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर शहरामध्ये आला. भैरव यांनी चंद्रपूर शहरात पाय ठेवला तर खरा पण एका गावातून आलेला मुलगा जेव्हा शहरात येतो तेव्हा तो पूर्णपणे भारावून जातो. त्याला या शहरात सर्व काही नवीन असते. "अनोळखी असे चंद्रपूर शहर" ना कोणी मित्र, ना ओळखीचे मैत्रिणी, अशा सर्व कठीण परिस्थितीतून सुरू होतो त्याचा खरा जीवनाचा "अध्याय"

2021 मध्ये सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे मास्टर ऑफ आर्ट मास कम्युनिकेशन (MA/M.Comm) प्रथम वर्षात प्रवेश घेतला. सर्व वर्गातील मुलांना ओळखत नसल्याने वर्गातील विद्यार्थी त्याला आपल्यापेक्षा मोठे वाटू लागले. आपण सर्वात लहान असे त्याला वाटले. परंतु नंतर जसजसे दिवस समोर जातं गेले तसतसे त्याला सर्व ओळखू लागले. भैरवचा स्वभाव एकदम साधा सरळ, सर्वांसोबत असा स्वभावाचा भैरव आपले छोटेसे स्वप्न घेऊन आल्यानंतर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तो आधीपासून लिहित होता. चंद्रपूर शहरातील विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्र आणि डिजिटल मिडिया च्या संपादक, जिल्हा प्रतिनिधी व पत्रकार यांच्या सोबत ओळखी होती.

पत्रकारितेचं शिक्षण सुरू करण्याअगोदर त्यांने पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपले स्वतःचे पोर्टल आधार न्यूज नेटवर्क सुरू केले. भैरवकडे ना सायकल होती ना गाडी होती. परंतु पत्रकार परिषद असो किंवा कार्यक्रम तो नेहमी बातमी घ्यायला जायचा. एकट्याचा असा प्रवास अपेक्षा आकांक्षांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याची ओढ त्याला भासत होती. लोकांच्या गर्दीत जाऊन त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली. राजकीय क्षेत्रात त्याने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. २०२३ मध्ये भैरव धनराज दिवसे यांना कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला. भैरवला चंद्रपूर डिजिटल मीडिया उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. भैरवला नामांकित न्युज चॅनलवर काम करायचे आहे. तो एक यशस्वी पत्रकार बनून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करू इच्छितो.

अशा एका छोट्या गावातून आलेला भैरव धनराज दिवसे आपले छोटेसे स्वप्न सत्यामध्ये करून दाखविले. तू नेहमी असेच मोठे-मोठे पुरस्कार प्राप्त करावे आणि नेहमीच तू हा आनंद जपावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
प्रणाली रागीट
मास्टर ऑफ आर्ट मास कम्युनिकेशन

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने