कमलापूरचा हत्ती कॅम्प 12 दिवस राहणार बंद gadchiroli #elephant

Bhairav Diwase
0
गडचिरोली:- राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील हत्तींना बारा दिवसांची वैद्यकीय रजा देण्यात आली आहे. यामुळे पुढील 12 दिवस कमलापूर हत्ती कॅम्प बंद राहणार आहे.


फसलेले ट्रॅक्टर चालकाच्याच अंगावर उलटले; चिखलात दबून चालकाचा मृत्यू
https://www.adharnewsnetwork.com/2024/02/gadchiroli-chandrapur-death.html

गडचिरोली जिल्हातील सिरोंचा वन विभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्र आहे. येथे अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी असे आठ हत्ती आहेत. वाढत्या थंडीमुळे या हत्तींच्या तळपायाला भेगा पडताहेत. त्यांना चालताना त्रास जाणवल्याचे वन विभागाच्या अधिका-यांच्या लक्षात आले. या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी आठही हत्तींना बारा दिवसांची वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. सुमारे 10 दिवसांत हत्तींच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. सध्या हा हत्ती कॅम्प 12 दिवसांसाठी बंद राहणार आहे अशी माहिती नरेश चोके, वन परीक्षेत्र आधिकारी कमलापुर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)