"जाणता राजा" महानाट्यापूर्वी राजकीय महानाट्य चर्चेत #chandrapur

Bhairav Diwase
0

भाजप आणि जोरगेवार समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात आजपासून सुरू होणाऱ्या जाणता राजा महानाट्याच्या स्वागतद्वार उभारणीवरून भाजप आणि अपक्ष आमदार किशोर जोरगेवार समर्थकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे चित्र बघायला मिळाले. सुमारे तासभर चाललेल्या वादानंतर अखेर भाजपला स्वागत द्वार उभारण्यात यश आले. मात्र काहीवेळ चलेलल्या या शाब्दिक चकमकीमुळे परिसरात बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जाणता राजा महानाट्याच्या आधीच राजकीय पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या राजकीय महानाट्यामुळे हा विषय शहरात चांगलाच चर्चेत आला आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सर्वत्र जाणता राजा महानाट्याचे प्रयोग आयोजिले आहे. अशातच सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 2, 3, 4 आणि 5 फेब्रुवारीला चंद्रपूर येथील स्थानिक चांदा क्लब क्रिडांगण येथे जाणता राजा या महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात सर्वत्र या महानाट्याचे आयोजन केले आहे. मात्र सर्वत्र या महानाट्याचे प्रयोग शांततेत होत असतांना चंद्रपूर शहरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थकांमध्ये राजकीय महानाट्य बघायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)