Top News

चंद्रपूरात 5 फेब्रुवारीपर्यंत 'जाणता राजा' महानाट्याचे प्रयोग #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर चार दिवस या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी मुनगंटीवार यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत झाला. दरम्यान चंद्रपूरमध्ये 5 फेब्रुवारीपर्यंत 'जाणता राजा' महानाट्याचे प्रयोग होणार असून सोमवारचा शेवटचा प्रयोग सर्वांसाठी खुला राहणार आहे.

चंद्रपूर येथे जाणता राजा या महानाट्याचे आयोजन 4 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले होते. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला विशेष बाब म्हणून येथे एक दिवस जास्त म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत 'जाणता राजा'चे प्रयोग वाढविण्याची घोषणा केली. दररोज सायंकाळी सहानंतर या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीचा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्यापासून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे सोमवारी प्रयोगाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने