Top News

चंद्रपूरचे मिर्झापूर होणार का?:- आ. प्रतिभा धानोरकर #chandrapur

चंद्रपूर:- शहराची कायदा व सुव्यस्था तसेच शांतता व सलोख्यासाठी ओळख आहे. परंतू सद्या चंद्रपूर शहराला कोणाची नजर लागली हे कळत नाही. शहरात अवैध धंद्यासोबत खुनी सत्र सुरु असून याला वेळीच आवर न घातल्यास चंद्रपूरचे मिर्झापूर होण्यास वेळ लागणार नाही, अशी संतप्त भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्व. शिवा वझरकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी सांत्वनपर भेटी दरम्यान व्यक्त केली.

चंद्रपूर शहरात बेरोजगारी वाढत चालली असून काही युवक अवैध धंद्याच्या मार्गातून झटपट पैसा कमविण्याच्या हेतू ने तरुण युवकांना हाताशी धरुन गुंडागर्दी तसेच अवैध मार्गाकडे वळवित असल्याचे चिन्ह सध्या चंद्रपूर शहरात दिसून येत आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात निरपराध शिवा वझरकर या तरुण युवकाला घोळक्याने संघटीत गुन्हेगारीचा वापर करुन हत्या केली. या हत्येचा निषेध व्यक्त करुन आ. धानोरकर यांनी शिवा वझरकर यांच्या कुटूंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी आरोपींवर मोक्का कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी आपण येणाऱ्या काळात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन अशा घटना होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने पाऊले उचलावी अशा सुचना करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने