स्वप्निल राऊत ची संभाजी ब्रिगेड च्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड #Brahmapuri

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील नांदगाव येथील स्वप्नील राऊत यांचे संभाजी ब्रिगेडच्या तालुका उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

स्वप्निल राऊत हे अनेक पासून त्यांचे सामाजिक कार्य संभाजी ब्रिगेड पक्षात निरंतर करत आहेत. या वेळी ते बोलताना म्हणले कि संभाजी ब्रिगेड ही संघटना कोना एका जातीची नसून सर्वांचा सामाजिक हित जोपासणारी संघटन हे अगोदर सर्वांनी समजून घेतले पाहिजे. खरतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणार्थ मोठ्या आदराने संभाजी ब्रिगेड हे नाव देण्यात आले असून या संघटनेत सर्व जाती धर्मा चे कार्यकर्ते पदाधिकारी निःस्वार्थी पणे सामाजिक आणी राजकीय कार्य करत आहेत. या ठिकाणी कसलाही भेदभाव केला जात नाही.

या वेळी रवि मेश्राम ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष, सुरज तलमले तालुकाअध्यक्ष ब्रह्मपुरी, राजेशजी माटे शहराध्यक्ष ब्रह्मपुरी, विश्वास हुमने, दीक्षित बागडे, सचिन तलमले, निहाल ढोरे, तेजस राऊत, प्रेमचंद राऊत, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील सामाजिक वाटचालीस सर्वांनी स्वप्निल राऊत यांना शुभेच्छा दिल्या.