Top News

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भद्रावती वरोरा संघांचे वर्चस्व #chandrapur #bhadrawati


विजेत्या संघांना बक्षिसांचे वितरण
भद्रावती:-भद्रावती येथील प्रियदर्शनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कबड्डी, व्हॉलीबॉल तथा क्रिकेट या खेळांचा समावेश होता.

या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करून भद्रावती येथील संघांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संस्थांच्या 42 संघांनी भाग घेतला होता. कबड्डी स्पर्धेत श्री बालाजी आयटीआय वरोरा संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर शहरातील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. क्रिकेट स्पर्धेत शहरातील प्रियदर्शनी आयटीआय संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर शहरातील भवानी आयटीआयच्या संघाने दुसरे स्थान प्राप्त केले. व्हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील शिंदे महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर प्रियदर्शनी आयटीआय संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. याशिवाय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज विनायक माडोत, उत्कृष्ट फलंदाज नीरज कोरडे, कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट रॅडर शुभम डोंगे, उत्कृष्ट डिफेंडर राकेश कोब्रे, व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट स्मॅशर चेतन लांडे व उत्कृष्ट लिप्टर म्हणून ज्ञानेश्वर पालखी यांना गौरविण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय छत्रपती चषक स्पर्धेत विदर्भाकडून खेळणाऱ्या आठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सर्व विजेत्या संघांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माजी विधान परिषद आमदार बाळासाहेब साळुंखे,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,इंटक नेते तथा प्रियदर्शनी आयटीआयचे संचालक धनंजय गुंडावर, डॉ. यशवंत घुमे, के.के. सिंह,प्रफुल चटकी, शंकर दास,सरीता सुर,नरेंद्र गुंडावार, नम्रता गुंडावार, सोनाली गुंडावार आदी मान्यवर उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने