चंद्रपूर:- शनिवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 रोजी पोलीस फुटबॉल ग्राउंड ताडोबा रोड तुकूम, चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन "नव चैतन्य" पोलीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी, चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांनी सदर पोलीस महोत्सवात सहभागी होवुन पोलीस दलातील दैनंदिन कार्यप्रणालीची माहिती, कायद्याचे समर्थन, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व सार्वजनिक सुव्यवस्था राखणे बाबतची माहिती स्वतः आणि आपल्या पाल्यांना करवून दयावी.
चंद्रपूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक मुमम्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांकरीता विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता "मी BRAND AMBASSADOR" या संकल्पनेतून चंद्रपूर पोलीस दलाकडून "नव चैतन्य" पोलीस महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले असुन सदर कार्यकमा अंतर्गत जिल्हयातील विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीसांचे BRAND AMBASSADOR बनवुन त्यांना पोलीस यंत्रणेची जवळून ओळख करुन देण्यास तसेच शासन आणि सुरक्षा यात सकिय भागीदार होण्यास मदत करेल. तसेच कायदा पाळणारा समाज घडविण्यात मोलाची भूमिका बजावतील. सामाजिकदृष्ट्या समर्पित आणि जबाबदार विद्यार्थ्यांची नवीन पिढी जोपासुन एक नव्या युगाची सुरुवात करीत आहेत.
तरी, याद्वारे जिल्हयातील सर्व नागरीक, शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, कोचींग क्लासेस प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, त्या स्वतः तसेच विद्यार्थ्यांना, पाल्यांना दिनांक 24 फेब्रुवारी, 2024 चे सकाळी 10:00 वाजता ते सांयकाळी 06:00 वाजेच्या दरम्यान चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाकडुन आयोजित "नव चैतन्य" पोलीस महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.