आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता चिमूर (जि.चंद्रपूर) येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती.

शनिवार, दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राजुरा येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2 वाजता वरोरा येथे आगमन व आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4 वाजता वरोरा येथून वणी (जि. यवतमाळ) कडे प्रयाण करतील.