हायवाची दोन दुचाकींना धडक, तिघांचा जागीच मृत्यू #chandrapur #Gondpipari #ballarpur #accident


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असून सुरजागडला लोह खनिज आणण्यासाठी निघालेल्या हायवाने दोन दुचाकींना धडक दिली. कोठारी मार्गावरील अक्सापूर येथील मंदिरासमोर झालेल्या या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दुचाकी गोंडपिंपरी येथून चंद्रपूर मार्गे जात असताना विरुद्ध दिशेने सुरजागडला लोह खनिज आणण्यासाठी निघालेल्या हायवाने दुचाकींना उडवे. या धडकेत दुचाकीवरून तिघांचा मृत्यू झाला. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात शैलेंद्र कालिप्तराय वय 63 वर्ष रा. विजनगर मुलचेरा, जि. गडचिरोली, अमृतोष सुनील सरकार 34 कालीनगर, मनोज निर्मल सरदार 43 विजयनगर मुलचेरा, जि. गडचिरोली असे आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस दाखल झाले आहेत. हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने