Top News

".....तर आमचा मराठा आरक्षणाच्या त्या मागणीला पाठिंबा' महादेव जानकरांच वक्तव्य #chandrapur #Mahadevjankar

चंद्रपूर:- राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री, आ. महादेव जाणकर आज चंद्रपुरात आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन केलं. महादेव जाणकर यांनी आरक्षणाच्या विषयावर वक्तव्य करीत कोर्टात मराठा आरक्षण 100 टक्के टिकणारं व त्याबाबत तिळमात्र शंका नाही. मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण न घेता स्वतंत्र आरक्षणाची बाजू मांडावी. आमचा पण त्यांच्या त्या मागणीला पाठिंबा असणार आहे. त्यांनी ओबीसीमधून आरक्षण घेऊ नये. असेही ते म्हणाले.

भारतात जिथे उमेदवार मिळतील तिथे लोकसभा लढवणार

लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election 2024) महादेव जानकर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष भारतात जिथे उमेदवार मिळतील त्या सर्व ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशम, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ या ठिकाणच्याही निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जानकर म्हणाले "जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हालाही तेच करावे लागेल."

हे सत्तेत येत नव्हते तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून त्यांनी सत्ता हस्तगत केली. मात्र नंतर सत्तेचा घमंड त्यांच्या डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हालाही तेच करावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरून जनतेत जाऊन मते आजमावत आहे. आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

"जिसकी जीतनी संख्या, ऊसकी उतनी भागीदारी असायला.. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे"

ओबीसी घटकांतील काही जातींना शून्य टक्के आरक्षण आहे. त्यांचे कोण बघणार आहे. जे ताकदवान आहेत, त्यांचेच ऐकले जाणार असेल तर लहान घटकांचे काय?. जिसकी जीतनी संख्या, ऊसकी उतनी भागीदारी असायला हवी. त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर ( Mahadev janakar ) यांनी केली आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्याशिवाय कोणत्या समाजाची किती लोकसंख्या समजणार नाही. आज राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज राहतो, मात्र ९ टक्के देखील आरक्षण त्यांना मिळालेले नाही. हे अपयश कोणाचे आहे. लोकशाही म्हणून ज्यांनी ज्यांनी राज्य केले, त्या सगळ्यांचे ते अपयश आहे, असेही जानकर पुढे म्हणाले.

विदर्भाचा विकास स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय होणार नाही

विदर्भाचा विकास स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय होणार नाही, असे जानकर म्हणाले. राष्ट्रीय समाज पार्टीचा वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा आहे. जानकर म्हणाले छोटी राज्ये विकासाला पूरक असतात, विदर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा, वने, पाणी, मॅगनिज, लोहखनिज, चुनखडक, डोलामाइट येवढ्या मोठ्या प्रमाणात खनिजसंपत्ति विदर्भात आहे यातूनच येथे उद्योग धंधे निर्मिती साठी उद्योगपतींना आकर्षित करता येईल. पैसा त्यांचा, कच्चा माल विदर्भाचा ज्यातून प्रचंड प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन येथील विपन्नावस्था संपेल.

पंकजाताई भाजपा सोडणार नाही

पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चाना उधान आलं होतं. त्यावर बोलताना जानकर म्हणाले की, पंकजा ताई भाजपनं राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती केली आहे. पंकजाताई कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, त्यांच्या वडिलांचं संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये गेलंय. ऊन-पाऊस सर्वच पक्षांमध्ये असतो. असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंच्या पक्षांतराच्या बातम्यांचं खंडन केलं आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने