Top News

मित्रांसोबतची दारूची पार्टी ठरली अखेरची! #Chandrapur #murder


चंद्रपूर शहरात मित्रांने केली मित्राची धारदार शस्त्राने हत्या

चंद्रपूर:- चंद्रपुर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अष्टभुजा वार्ड निवासी सुरजसिंह कुंवर (वय 25) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजसिंह कुंवर व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. शुक्रवारी दि. 16 फेब्रुवारी रात्री मृत सुरजसिंह कुंवर हा मित्रांसोबत दारूची पार्टी करीत होता. दरम्यान आपसात त्यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यांनतर आरोपीनी धारधार शस्त्राने सूरजची हत्या केली.हत्या केल्यावर आरोपींनी नी सूरजचा मृतदेह अष्टभुजा येथील मनपाच्या डम्पिंग यार्ड येथे कचऱ्याच्या खड्ड्यात टाकला, जेणेकरून कुणाला मृतदेह मिळणार नाही. मात्र दि. १७ फेब्रुवारीला घटनास्थळावर परिसरातील नागरिकांना रक्ताचा सडा आढळून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

रामनगर पोलीस तात्काळ अष्टभुजा येथे दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला असता सुरजसिंह हा सकाळपासून दिसला नसल्याचे आढळून आले, सखोल व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह डम्पिंग यार्ड मधून शोधून काढला.

रात्री सूरज कुणासोबत होता याबाबत माहिती काढली असता या प्रकरणात अविनाश सोनटक्के, आदर्श हलधर, धम्मदीप उर्फ राजा इंगळे व अभिषेक मेहता यांना अटक करण्यात आली. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने