Top News

दारू पिण्यावरून पत्नीने टोकले, पतीने विहिरीतच उडी घेतली #chandrapur #Nagpur

नागपूर:- दारू पिण्यावरून पत्नीने टोकल्यावर पतीने संतापात थेट विहीरीतच उडी घेत आत्महत्या केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. माणिक गुलाब देवकर (२५, दुर्गधामना) असे मृतकाचे नाव आहे. तो रस्त्याच्या साईटवर काम करत होता.

७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तो घरी दारू पिऊन आला. त्यामुळे पत्नीने त्याला टोकले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. संतापात माणिक जेवण न करताच घराबाहेर पडला. हे पाहून त्याच्या सासू ललिताबाई या त्याला बोलविण्यासाठी बाहेर आल्या. मात्र माणिकने घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका फार्महाऊसमधील विहीरीत उडी घेतली. ललिताबाई यांनी आरडाओरड केली. मात्र मदत मिळेपर्यंत माणिकचा बुडून मृत्यू झाला होता. माणिकची पत्नी रेखा हिच्या सूचनेवरून हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने