Top News

रामपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

रामपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

सरपंच निकिता रमेश झाडे यांच्या पुढाकाराने महिला शक्ती आले एकत्र.

राजुरा:- तालुक्यातील रामपूर येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रामपूर ग्रामपंचायतच्या कार्यक्षम सरपंच सौ निकिता रमेश झाडे यांच्या पुढाकाराने रामपूर मधील महिला शक्ती एकत्र आली.
या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिलांचा सहभाग बघायला मिळाला.

विविध उपक्रमासह रामपूर येथे महिलांनी सहभाग घेत अतिशय स्तुत उपक्रम घडवून आणला. आपले मनोगत व्यक्त करताना सौ निकिता रमेश झाडे यांनी सर्व महिलांचे आभार मानले.

याप्रसंगी प्रामुख्याने वंदनाताई वामनराव चटप, मनीषाताई चटप, आशाताई बबन उरकुडे सरपंच गोवरी, सुरेखाताई बोंडे, वैशालीताई लांडे ग्रा प सदस्य, रेखा आत्राम ग्रा प सदस्य, संतोषी दुधे ग्रा प सदस्य, मंजुषा लांडे ग्रा प सदस्य, गौरी चोकारे ग्रा प सदस्य,माया करलुके ग्रा प सदस्य, मायाताई मालेकर, सिंधुबाई लांडे, मैनाबाई रोगे, शितल बानकर, पुष्पा ढवस, गिरी ताई, उरकुंडे आजी, शैलाताई उरकुडे, गणपती चौधरी, मोनिका लांडे, किरण विरुटकर, सुवर्णाताई झाडे, शोभा बोबडे, वर्षाताई कुडे, शेंडेताई, किरण लांडे, सुमन बोबडे, गौरकारताई, निखोडेताई, कोवेताई, मयुरी आस्वले, आशा वर्कर स्टॉप आणि हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने