पोंभुर्णा:- वनपरिक्षेत्र पोंभुर्णा उपक्षेत्र घोसरी अंतर्गत नवेगाव भु. नियतक्षेत्रांतर्गत मुल तालुक्यातील मौजा चांदापूर, गडीसुर्ला, जुनासुर्ला गाव/शेतशिवार परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ या वन्यप्राण्याचा वावर सुरू असल्याने मध्यचांदा वनविभाग मार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा व वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक 12 फेब्रुवारीला कलापथक पथनाट्य सादर करुन वनसंवर्धन, वनसंरक्षण, वनवनवा पासुन होणारे अतोनात नुकसान, वन्यजीवाचे महत्व, वाघ, बिबट सारख्या वन्यप्राण्यांचा गावा लगत व शेतशिवार परिसरात वावर असल्यास गावकरी, शेतकरी तसेच गुराखी यांनी घ्यावयाची खबरदारी व वनाची आवश्यकता बाबत जनजागृती करण्यात आली.
✅
जनजागृती कार्यक्रमास चांदापूर, गडीसुर्ला, जुनासुर्ला येथील गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जनजागृतीसाठी युवा बहुउदेशीय बचत गट मारोडा चे कलापथक यांनी पथनाटय सादर केले.
✅
सदर जनजागृती कार्य्रक्रम राबविण्याकरीता श्वेता बोड्डु उपवनसंरक्षक मध्य वनविभाग, चंद्रपूर, आदेशकुमार शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात फनींद्र गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, पोंभुर्णा, अजय बोधे क्षेत्र सहाय्यक घोसरी, विनायक कस्तुरे वनरक्षक नवेगांव भु. व इतर वनकर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेऊन जनजागृती चा कार्यक्रम पार पाडला. सदर कार्यक्रमास सौ. सोनीताई देशमुख सरपंच चांदापूर, सौ. शारदा येनुरकर सरपंच गडीसुर्ला, श्री. रंजीत समर्थ सरपंच जुनासर्ला व पदाधिकारी यांची उपस्थीती होती.