Top News

अवैध दारू विक्री च्या विरोधात माय-माऊल्या झाल्या रणरागिणी! #Chandrapur #sindewahi


सिंदेवाही:- लाडबोरी गावात होत असलेल्या अवैध दारू विक्री च्या विरोधात माय माऊल्या सज्ज झाल्या असून अवैध दारू विक्री करणाऱ्या च्या मुसक्या आवळण्यासाठी सकाळ चे चार वाजता पासून पहारा देणे सुरु केले आहे,गावात अवैध दारू विक्री सुरु असल्यामुळे मोठ्या माणसांसोबत तरुण मुल ही दारूच्या मोठ्या प्रमाणात आहारी गेले आहेत,त्यामुळे या तरुण पिढीला वाचविण्यासाठी महिलांनी एकत्र येऊन संपूर्ण गावात दारू बंदी करण्याचा निश्चय केला,व तहसीलदार व पोलीस निरीक्षक याची भेट घेऊन निवेदन देण्यात आले,तर संपूर्ण गावात अवैध दारू विक्री झालीच नाही पाहिजे या साठी वॉर्डात वार्डात समिती तयार करून अवैध दारू विक्री करणाऱ्या ना सळो की पळो करून सोडत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने