व्यापाऱ्याच्या घरावर सिनेस्टाईल दरोडा #Nagpur #theft

नागपूर:- मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. दुसरीकडे झटपट पैसा कमवण्याचा नादात काहीजण चोरी तसेच दरोड्यासारख्या घटना घडवून आणत आहेत. असाच काहीचा प्रकार नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात घडला.


ओमनगर परिसरात फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर शनिवारी ३ फेब्रुवारीला रात्री पाच ते सहा आरोपींनी दरोडा टाकला. चाकूचा तसेच खंजीरीचा धाक दाखवत आरोपींनी घरातील आठ लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने