Top News

चंद्रपूर शहरातील रस्त्यावर उतरले "यमराज" #chandrapur #Yamraj


नियम पाळा अन्यथा माझ्या सोबत चला!

चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यात दिनांक १५ जानेवारी, २०२४ पासुन ते १४ फेब्रुवारी, २०२४ पावेतो ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ राबविण्यात येत असुन त्याअतंर्गत जिल्हयात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी, निर्भयपणे रस्त्यावर प्रवास करता यावा यासाठी आज दिनांक ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ०९:३० वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथुन शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती फेरीचे आयोजन करुन रस्ते सुरक्षा जिवन रक्षा हा संदेश देण्यात आला. सदरच्या रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती फेरी मध्ये पोलीस वाहनावर हेल्मेटची प्रतिकृती व यमराज बसवुन हेल्मेटचा जिवनातील महत्व तसेच पोलीस वाहनाची जनजागृती रथ तयार करुन शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी-विदयार्थी तसेच नागरीकांना रस्ता सुरक्षाचा महत्व समजुन येथील असे चित्ररथ व स्लोगन असलेले वाहने समाविष्ट केले.

तसेच सदर फेरी मध्ये चंद्रपूर शहरातील भवानजीभाई चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर, मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चंद्रपूर, रफी अहमद किदवाई हायस्कुल, चंद्रपूर, चांदा पब्लीक स्कुल चंद्रपूर आणि विद्या निकेतन हायस्कुल चंद्रपूर येथील ३०० विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी शालेय गणवेषात सहभाग घेवुन नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथुन प्रियदर्शनी चौक आणि परत प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय चंद्रपूर येथे जनजागृती फेरीचे समापन करण्यात आले.

आज रोजीच्या शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती फेरीला श्री विनय गौड़ा जी.सी. जिल्हाधिकारी चंद्रपूर तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन यांनी हिरवी झेंडी दाखवुन फेरीची सुरुवात केली. सदर प्रसंगी जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे समवेत अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री किरण मोरे, वाहतुक पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव, श्री प्रविणकुमार पाटील व प्रादेशिक परिवहन विभागाचे इतर मोटार परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीस अंमलदार हजर होते.

तरी, याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी सदैव वाहतुक नियमांचे पालन करुन स्वतःची व इतरांची सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने