भरचौकात तरुणाची गोळी झाडून हत्या, घटनेनंतर दुचाकी जाळली #yavatmal #murderer #firing

Bhairav Diwase
0

यवतमाळ:-  यवतमाळमध्ये भरचौकात गोळी झाडून तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दुचाकी जाळण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं. दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी तरुणाची हत्या करण्यात आली. क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे. शादाब खान रफिक खान वय 22 असे मृत तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मनिष शेंद्रे आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी शादाब याच्या गाडीचा कट लागला. गाडीचा कट लागल्याच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपी शादाबच्या घरापर्यंत पोहोचला, त्याने मैत्रीण आणि मला शिवीगाळ का केली असा जाब विचारत मारहाणीपर्यंत प्रकरण केलं.

रागाच्या भरात मनिष शेंद्रे यांनी देशी कट्ट्याने गोळीबार केला. जखमी शादाबला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोळी छातीला लागल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. परिसरात तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी चौकात कडेकोट बंदोबस्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)